शिरूर। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पुजा व आरती करून स्थानिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केले ‘अनोखे आंदोलन’

शिरूर । पुणे – नगर या मुख्य रस्त्यावर पाबळफाटा ते पाषाणमळा या भागात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. येथील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहे. याचा थेट परिणाम येथील रहिवासाना होत आहे.
शिरूर नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने पाबळफाटा येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पुजा व आरती करून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सावळेराम आवारी, शिरूर शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे,संदिप कडेकर,ॲड.सुभाष छाजेड,सागर परदेशी,प्रदिप तिवारी,सुरेश पाटील यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
शहरातुन जाणाऱ्या या मुख्य पुणे – नगर रस्त्याचा शालेय विद्यार्थी, नागरिक, महिला व प्रवाशांसह मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. पाबळफाटा ते पाशाणमळा रस्त्यावरुन जात असताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे .असा प्रश्न सर्वत्र चर्चेत आला आहे. पाषाणमळा येथील ओढ्यावरील पुलाचे कठडे हि तुटलेले असून लहान मोठे अपघात घडत आहे.
निवेदन देऊन मागणी करूनही या रस्त्याचे काम होत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्याची पुजा व आरती करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सावळेराम अवारी व नाभिक संघटनेचे अध्यक्ष प्रितेश फुलडाळे,मनसेचे संदिप कडेकर सामाजिक कार्यकर्ते सुभाष छाजेड व उपस्थितांनी सांगितले.





