Nhavare News : शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता ८ महिन्यांची गर्भवती, आरोपीला ठोकल्या बेड्या
Nhavare News : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून आणि धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Nhavare News : अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तसेच धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. (Nhavare News)
दरम्यान, वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी सात ते आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीरंग ठकाजी अनोसे (रा. अनोसेवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन कारवाई करण्यात आली आहे. पीडित मुलगी १७ वर्षांची असून, १ फेब्रुवारी २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. (Nhavare News)
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिला वडापावसाठी पैसे देण्याचे आमिष दाखविले. तसेच धमकी देऊन तिच्यावर दोन वेळा अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची नेमकी तारीख आठवत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (Nhavare News)
या घटनेनंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत ती सुमारे सात ते आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार, वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध प्राथमिक माहितीच्या आधारे आरोपीविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम पॉक्सो कायदा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nhavare News)
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. (Nhavare News)





