शिरूर पोलिसांची अवैध दारू विक्रीविरोधात धडक मोहीम: चार ठिकाणी कारवाई, गावठी-विदेशी दारू जप्त

शिरूर : शिरूर पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात धडक मोहीम राबवत चार ठिकाणी कारवाया करून गावठी हातभट्टी आणि विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखालील या कारवायांमुळे अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
23 एप्रिल रोजी मलठण येथे ओम विजय मुरकुटे (वय 23) याच्याकडून 10 लिटर गावठी दारू (किंमत ₹1000) जप्त करून अटक केली. 25 एप्रिल रोजी बाबुराव नगर येथे शफीकुल अस्बर अली (वय 35, मूळ बिहार) याच्याकडून 25 लिटर गावठी दारू (किंमत ₹2500) हस्तगत केली. 26 एप्रिल रोजी अण्णापुर येथे स्वप्निल दिनकर शिंदे (वय 32) याच्याकडून विदेशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹2690) आणि मांडवगण फराटा येथील हॉटेल रान जत्रा येथे प्रदीप कुबेर गिरी (वय 40) याच्याकडून देशी-विदेशी दारू (किंमत ₹5110) जप्त केली. सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल असून, चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांना कडक इशारा देत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून शिरूर तालुका दारूमुक्त होईल.





