Shirur News : मोबाईल टॉवरवरून सोलर वीज साहित्य चोरीला; २०,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास

Shirur News : शिरूर शहरातील प्रीतमप्रकाशनगर येथे मोबाईल टॉवरवरील सोलर वीज उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध महत्त्वाच्या केबल्स व साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी युवराज ईरभान वानखेडे (वय ५६, व्यवसाय नोकरी, रा. कुंभारवाडा, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता ते दि. १४ जून रोजी रात्री २.३५ वाजेच्या दरम्यान इंडस टॉवर्सच्या टॉवर नंबर १०५२२४२ (प्रीतमप्रकाश नगर, शिरूर) येथून विविध प्रकारच्या सोलर व कॉपर केबल्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या.
चोरी गेलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे :
₹३,५०० किंमतीच्या बॅटरीबॅक पॉवर केबल (१० मीटर),₹३,५०० किंमतीच्या DCDB कॉपर केबल (२० मीटर),₹३,००० किंमतीच्या सोलर कॉपर केबल (०७ मीटर),₹२,००० किंमतीच्या बॅटरीबॅक सेल कॉपर (०२ मीटर),₹६,००० किंमतीच्या सोलर कॉपर आर्मड केबल (१२० मीटर),₹२,००० किंमतीच्या BTS कॉपर केबल (३० मीटर) एकूण अंदाजित किंमत – ₹२०,०००/-
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 414/2025 प्रमाणे भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार उमेश भगत हे करतआले. या प्रकारामुळे मोबाईल टॉवरच्या कार्यप्रणालीवर परिणाम होण्याची शक्यता असून, टॉवर व्यवस्थापनासही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील मोबाईल टॉवर व अन्य तांत्रिक पायाभूत सुविधांवर हात साफ करणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्यांविरुद्ध कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. शिरूर पोलीसांनी लवकरात लवकर या अज्ञात चोरट्याचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




