Shirur News : मलठणमध्ये सेवानिवृत्त पोलिसाची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून १७.३५ लाख रुपये परस्पर हस्तांतरित
Shirur News : मलठण (ता. शिरूर) येथे सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने यूपीआय व मोबाईल बँकिंग प्रणालीचा गैरवापर करून तब्बल १७ लाख ३५ हजार २३६ रुपये १ पैसे परस्पर हस्तांतरित केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Shirur News : मलठण (ता. शिरूर) येथे सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने यूपीआय व मोबाईल बँकिंग प्रणालीचा गैरवापर करून तब्बल १७ लाख ३५ हजार २३६ रुपये १ पैसे परस्पर हस्तांतरित केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Shirur News)
याप्रकरणी विनायक रामचंद्र शिंदे (वय ५९, रा. रामहिरा बंगला, दत्तनगर, शिंदेमळा, मलठण, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(क), ६६(ड) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shirur News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्रीपासून १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत शिंदे हे आपल्या घरी असताना त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील विविध खात्यांमधून त्यांच्या संमतीशिवाय रकमा हस्तांतरित करण्यात आल्या. (Shirur News)
अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या उद्देशाने यूपीआय व मोबाईल बँकिंग प्रणालीचा वापर करून वेळोवेळी व्यवहार करत एकूण १७.३५ लाख रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. (Shirur News)
आपल्या खात्यातील रक्कम परस्पर हस्तांतरित झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिंदे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३७ वाजता शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Shirur News)
या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, ऑनलाइन व्यवहारांचा मागोवा घेऊन रक्कम कोणत्या खात्यांमध्ये हस्तांतरित झाली आणि या फसवणुकीमागे कोण आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. (Shirur News)
ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना नागरिकांनी अनोळखी लिंक, ओटीपी, यूपीआय पिन किंवा बँकिंगविषयक गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. (Shirur News)





