Shirur News : कवठे यमाईतील तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
Shirur News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Shirur News : शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे १७ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी शिरूर पोलिसांनी तडीपार आरोपीसह तिघांना अटक केली आहे. जीवे मारण्याची आणि हात-पाय तोडण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्यामुळे अल्पवयीन मुलाने भीतीपोटी गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आला आहे. (Shirur News)
न्यायालयाने तिन्ही आरोपींना ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी मृत समीर शाकीर पठाण (वय १७) याची आई आस्मा शाकीर पठाण (रा. चंदननगर, कवठे यमाई) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Shirur News)
फिर्यादीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी समीर मोटारसायकलवरून घरी जात असताना योगेश तुकाराम देवकर आणि नवनाथ उर्फ बाबू निलेश बोडरे यांनी जुन्या वादाच्या कारणावरून त्याला अडवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या अर्चना दादाभाऊ जाधव हिने, याला जीवे मारू नका, हात-पाय तोडून आयुष्यभर घरात बसवूया, असे म्हटल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. (Shirur News)
या धमक्यांमुळे समीर प्रचंड घाबरला होता. त्यानंतर त्याने राहत्या घरी लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. (Shirur News)
शिरूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत योगेश देवकर आणि नवनाथ बोडरे यांना ५ जुलैच्या पहाटे अटक केली. त्यानंतर अर्चना जाधव हिलाही सकाळी अटक करण्यात आली. (Shirur News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश देवकर याच्यावर दरोडा, चोरी आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत अनेक गुन्हे दाखल असून, त्याला यापूर्वी दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. (Shirur News)
अर्चना जाधव हिच्यावरही दारूबंदी कायद्यांतर्गत आणि इतर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर नवनाथ बोडरे याच्याविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (Shirur News)
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत करत असून, गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी केली आहे. या घटनेमुळे कवठे यमाई परिसरात मोठी खळबळ उडाली असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील सर्व कारणे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Shirur News)
Shirur News: तडीपारीच्या आदेशाला हरताळ; कवठे यमाई येथून सराईत आरोपी जेरबंद





