नेवासातून निघणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग
Shirur : शिरूर तालुक्यातील तांदळी परिसरातील शेतशिवारात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य (एक्सपायरी) खाद्यपदार्थांचा साठा अज्ञात व्यक्तींनी फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पालखी सोहळा वैभवशाली करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे : हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री
नेवासा, प्रतिनिधी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या नेवासा येथून निघणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी दिंडी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या वतीने मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या नियोजन बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला वारकरी, नागरिक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख महंत वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री होते. यावेळी बोलताना त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी दिंडी सोहळा अधिक वैभवशाली आणि भक्तिमय करण्यासाठी सर्वांनी तन, मन आणि धनाने योगदान देण्याचे आवाहन केले.
बैठकीच्या प्रारंभी संस्थानचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. विश्वस्त कृष्णाभाऊ पिसोटे यांनी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी नेवासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार, नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील, अॅड. संजय सुखदान, सतीश मुळे, अशोक डहाळे, कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण, नगरसेवक स्वप्नील मापारी, जगन्नाथ कोरडे, हरि महाराज भोगे, मुरलीधर कराळे, मनोज पारखे आदींनी मनोगत व्यक्त करत पालखी सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री म्हणाले, “नेवासा हे केवळ तीर्थक्षेत्र नसून श्रेष्ठ क्षेत्र आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी या भूमीत अडीच वर्षे वास्तव्य करून ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, ही नेवासेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या क्षेत्राचा विकास आणि उंची वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. मंदिर विकासाबरोबरच गावकऱ्यांचा सहभागही महत्त्वाचा आहे. माऊलींचा पैस हा केवळ खांब नसून तो परिस आहे. त्यावर श्रद्धेने मस्तक टेकवल्यास जीवनाचे सोने होऊ शकते,” असा आध्यात्मिक संदेश त्यांनी दिला.
या बैठकीस नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे, अॅड. संजीव शिंदे, नगरसेविका डॉ. मनिषा वाघ, डॉ. निर्मलाताई सांगळे, डॉ. शंकरराव शिंदे, डॉ. निलेश लोखंडे, रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, ज्ञानेश्वर पेचे, सतीश पिंपळे, नगरसेवक जितेंद्र कु-हे, संभाजी धोत्रे, राजेंद्र काळे, असिफ पठाण, जालिंदर गवळी, कृष्णा परदेशी, दिनेश व्यवहारे, मुक्तारभाई शेख, निरंजन डहाळे, राहुल चव्हाण, अनिल शिंदे, राजेश कडू यांच्यासह मोठ्या संख्येने नेवासकर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी भैय्या कावरे यांनी केले.





