Shirur accident News : शिरुर तालुक्यातील न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा तर त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे निमोणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी कार आणि ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात घडला. धडक इतकी जबरदस्त होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात पवन राजहंस काळे (वय 38) आराध्या पवन काळे (वय 9) आणि पवन काळे यांचे मेहुणे बाळासाहेब नागवडे (वय 38) यांचे निधन झाले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेग, रस्त्याची परिस्थिती किंवा इतर तांत्रिक कारणांचा तपास पोलीस करत आहेत. पंचनामा करुन पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. Sunil Tatkare : “प्रस्ताव आला तर…”; विलिनीकरणावर तटकरेंचं पुन्हा मोठं विधान, शशिकांत शिंदेंच्या लेखावर केलं भाष्य म्हणाले “गैर आणि…” या घटनेमुळे निमोणे गावात शोककळा पसरली आहे. काळे कुटुंब हे सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि सर्वपरिचित कुटुंब म्हणून ओळखले जाते. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. Shirur accident News : दरम्यान, नागरिकांकडून न्हावरे चौफुला रोडवरील वाढता वेग, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि रस्त्यावरील धोकादायक वळणांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. Shirur accident News : हेही वाचा : Top 10 News: मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा दिल्लीत ते भारत-पाक सामना रद्द होणार?; जाणून घ्या आजच्या TOP 10 NEWS एका क्लिकवर