Shiranthi Rajapaksa : श्रीलंकेच्या माजी फर्स्ट लेडी शिरांथी राजपक्षे यांना अटक
श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या पत्नी आणि माजी फर्स्ट लेडी शिरांथी राजपक्षे (Shiranthi Rajapaksa) यांना सिरलिया साविया या स्वयंसेवी सस्थेच्या बँक व्यवहारांमधील कथित गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

Shiranthi Rajapaksa : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या पत्नी आणि माजी फर्स्ट लेडी शिरांथी राजपक्षे (Shiranthi Rajapaksa) यांना सिरलिया साविया या स्वयंसेवी सस्थेच्या बँक व्यवहारांमधील कथित गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
लाचखोरी किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कोलंबोच्या पूर्वेकडील पोल्हेनगोदा या उपनरातील निवासस्थानातून शिरांथी राजपक्षे यांना अटक केली.
शिरांथी राजपक्षे (Shiranthi Rajapaksa) उपचारांसाठी सिंगापूरला गेल्या होत्या.त्या सोमवारी श्रीलंकेत परतल्या होत्या. शिरांथी राजपक्षे यांना पोलिसांच्या वित्तीय गन्हे विभागाकडून अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
शिरांथी राजपक्षे यांना पोलिसांच्या वित्तीय गुन्हे विभागाने १३ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी पाचारण केले आहे. त्यांच्यावर स्वयंसेवी संस्थेच्या बँक खात्यातून १० लाख श्रीलंका रुपये काढल्याचा आरोप आहे. सार्वजनिक मालमत्ता कायद्याखालील गुन्हे आणि भ्रष्टाचाराशी संबंधित तरतूदींखाली गैरव्यवहाराचाही आरोप आहे.
पोलिसांच्या वित्तीय गुन्हे विभागाच्यावतीने सिरलिया साविया या संस्थेच्या व्यवहारांबाबत तपास केला जातो आहे. २००५ ते २०१५ या काळात महिंदा राजपक्षे देशाचे अध्यक्ष असताना शिरांथी (Shiranthi Rajapaksa) या संस्थेच्या प्रमुख होत्या.






