Basil Rajapaksa : बसिल राजपक्षेंविरोधात इंटरपोलची मदत घेणार; श्रीलंकेच्या पोलिसांची माहिती
श्रीलंकेतील माजी मंत्री आणि माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे धाकटे बंधू बसिल राजपक्षे (Basil Rajapaksa) यांच्या अटकेसाठी श्रीलंका पोलीस इंटरपोलची मदत घेणार आहे. देशाच्या पोलीस प्रमुखांनी याबाबतची माहिती दिली.

Basil Rajapaksa : श्रीलंकेतील माजी मंत्री आणि माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे धाकटे बंधू बसिल राजपक्षे (Basil Rajapaksa) यांच्या अटकेसाठी श्रीलंका पोलीस इंटरपोलची मदत घेणार आहे. देशाच्या पोलीस प्रमुखांनी याबाबतची माहिती दिली.
बसिल राजपक्षे (Basil Rajapaksa) हे महिंदा राजपक्षे यांच्या सरकारमध्ये २०१० पासून २०१५ पर्यंत आर्थिक विकास मंत्री होते. नंतर दुसरे बंधू गोटाबाये राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखालील सरकारमध्ये ते २०१९ पासून २०२२ पर्यंत देशाचे अर्थमंत्री होते.
बसिल राजपक्षे यांच्यावर दक्षिण श्रीलंकेतल्या मातारा येथे बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल मनी लॉन्डरिंग आणि २०१४ च्या निवडणुकीसाठी सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप असून या प्रकरणी ते वॉन्टेड आहेत.
ते (Basil Rajapaksa) अमेरिकेत असल्याचे मानले जाते आहे. इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस बजावली गेल्यास ते इतर कोणत्याही देशात वास्तव्यास असल्याचे मानले जाते. गुन्हे अन्वेषण विभाग लवकरच बासिलसाठी ब्लू अलर्टची विनंती करेल, असे पोलीस प्रमुख प्रियंथा वीरासुरिया यांनी शनिवारी सांगितले.






