Shirala News : वाढदिवस कार्यक्रम रद्द करुन मुख्यमंत्री निधीसाठी मदत ; आ. सत्यजित देशमुख यांचा निर्णय

प्रभात वृत्तसेवा
शिराळा – शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करून महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधी संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती माजी सभापती हणमंतराव पाटील यांनी दिली.पाटील म्हणाले, ‘आ. देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु, राज्यामध्ये पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आ. देशमुख यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.’ कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी निधी संकलन करावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. मात्र, एका आगळ्या उपक्रमाचे नियजन कले आहे. त्यानुसार आ. देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि. ११ रोजी मतदारसंघातील प्रत्येक गावात सकाळी ८ ते १० या वेळेमध्ये सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला असून हा उपक्रम एकाच वेळी सर्वत्र राबवण्यात येणार आहे.





