मुंबई – फिटनेस फ्रिक असलेली मलायका अरोरा आपल्या हेल्थची नेहमीच काळजी घेते. डायट आणि व्यायाम हा मलायकाच्या जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनला आहे. नुतकतच मलायकाने एक नवीन फोटो शूट केलं. तेही बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटो ग्राफर डब्बू रत्नानी सोबत. या शूट दरम्यानचा ऑफ द कॅमेरा मलायकाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये ती हॉट तर दिसलीच आहे शिवाय अशा अंदाजात तिला यापूर्वी कोणीही पाहिलं नव्हतं.
मलायका अरोराचा अभिनयाशी तितका संबंध नाही. पण तिच्या बोल्ड आणि अप्रतिम डान्सने मलायकाने अनेक चित्रपटांमध्ये चार चाँद लावले आहेत. याशिवाय मलायका इंडियाज गॉट टॅलेंट, डान्स इंडिया डान्स अशा अनेक शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसली आहे.चित्रपटांपासून दूर असली तरी मलायका सोशल मीडियावर कायमच कॅचर्चेत असते. आता देखील मलायकाने केलेलं हे फोटोशूट तीच सर्वात बोल्ड फोटोशूट पैकी एक आहे.
मलायका अरोरा तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच वर्चस्व गाजवते. पण यावेळी मलायका अशी स्टाइल समोर आली आहे, ज्याला पाहून सर्वच जण धक्के झालेत. मलायकाच्या फोटोशूटच्या मेकिंगचा एक व्हिडीओ डब्बूने स्वतः आपल्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे.मलायकाने यावेळी पूर्णपणे ट्रान्सपरंट ड्रेस घातला असून ती स्विमिंग पुलच्या बाजूने पळताना दिसत आहे.
View this post on Instagram
यावेळी मलायकाने मादक आणि बोल्ड पोज देत अक्षरशः चाहत्यांना घायाळ केलं आहे. ट्रान्सपरंट चमकदार ड्रेस.. स्विमिंग पुलमधील पाणी आणि डब्बू रत्नानीची फोटोग्राफी यामुळे मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहे. वयाच्या 49 व्या वर्षीही मलायका एवढी फिट आणि बोल्ड असल्यानेच दिवसेंदिवस तिचे फॅनफॉलोविंग वाढत चालले आहे.