“उद्धव आणि राज ठाकरेंसह शिंदेंनीही एकत्र आले पाहिजे”; अखंड शिवसेनेसाठी ज्येष्ठ शिवसैनिकाचे आवाहन

Gajanan Kirtikar | उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यातच आता शिंदे गटातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“उद्धव आणि राज यांनी एकत्र आले पाहिजे ही महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिकांची इच्छा आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न झाला. ठाकरे ब्रँड कायम राहिला पाहिजे, अशी आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांची इच्छा आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येऊन अखंड शिवसेना एक झाली पाहिजे,” असे मत गजानन कीर्तीकर यांनी एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.
‘एकनाथ शिंदे बाहेर पडले पण, भाजपप्रणित…’
“दोघे एकत्र येतील की नाही हे माहिती नाही, त्यांनी अटी घातल्याचे ऐकले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले राज ठाकरेंनी महायुतीची सोबत सोडावी, तर हे म्हणाले काँग्रेसची सोबत सोडा, ते अगदी बरोबर आहे. आजच्या दोन शिवसेना आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपप्रणित आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आज माहिती नाही पण काल परवापर्यंत काँग्रेसप्रणित आहे. मूळ जो शिवसेनाप्रमुखांच्या विचारधारेचा प्रश्न आहे, हा विचार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. पण, भाजपप्रणित असल्यामुळे पुढे सरकायला त्यांना अडचणी येतात,” असे गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं आहे.
‘…तर एकनाथ शिंदे सुद्धा यांच्यासोबत आले पाहिजे”
“बाळासाहेबांना स्वत:ला वाटत होतं राज आणि उद्धव एकत्र यावे. आता राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याचा स्टँड घेतला आहे, तो चांगला आहे. पण बाळासाहेबांची कडवट आणि भव्य दिव्य शिवसेना महाराष्ट्रात पुन्हा उभी करायची असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा यांच्यासोबत यायला हवेत असं माझं मत आहे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या तिघांनी एकत्र आले तरच भक्कम शिवसेना दिसेल, असे गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं आहे. Gajanan Kirtikar |
‘अखंड शिवसेना ही काळाजी गरज’
“शिवसेना विभाजित असणे भाजपच्या पथ्यावर पडते. परंतु, अखंड शिवसेना ही काळाजी गरज आहे. अखंड शिवसेनेच्या पुढाकारासाठी मी पुढाकार घेईन, नक्की मला तसा अधिकारही आहे, कारण मी बाळासाहेबांपासून काम करतोय. शिवसेनेच्या जडणघडणीपासून काम करतोय, मराठी माणसांसाठी काम केल आहे. राज, उद्धव आणि एकनाथ शिंदेंना त्याची कल्पना आहे. त्यामुळे मी माझी इच्छा सांगेन, आग्रह धरेन, पुन्हा आमचे जुने दिवस येतील,” असे मत गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केले आहे. Gajanan Kirtikar |
हेही वाचा:





