Shinde group and Milind Devara | कॉंग्रेस मधून शिवसेनेच्या शिंदे गटात महिनाभरापुर्वी दाखल झालेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. पक्षाकडून राज्यसभेच्या एका जागेसाठी त्यांची आज अधिकृत निवड जाहीर झाली आहे.
मिलिंद देवरा हे कॉंग्रेसचे दक्षिण मुंबई मतदार संघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्या जागेवर महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा सांगितल्यानंतर देवरा अस्वस्थ झाले होते. | Shinde group and Milind Devara
त्यातूनच त्यांनी कॉंग्रसला रामराम ठोकून शिंदे गटाचा रस्ता धरला महायुतीत दक्षिण मुंबईची जागा भाजप लढवण्यास उत्सुक असल्याचे सांगितले जात असल्याने तेथेही त्यांची डाळ शिजेल की नाही.
अशी शंका निर्माण झाली असतानाच त्यांना शिंदे गटाने विनासायास संसदेत पाठवण्याचा मार्ग आज या निमीत्ताने मोकळा केला आहे. राज्यातील महायुतीत आता अजित पवार गटाचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. | Shinde group and Milind Devara