Shilpa Shetty Raj Kundra 60 crore scam: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुंबईतील व्यावसायिक दीपक कोठारी यांनी तब्बल ६०.४ कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली असून, हे प्रकरण Best Deal TV Pvt. Ltd या ऑनलाईन शॉपिंग कंपनीशी संबंधित आहे. आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, कोठारी हे Lotus Capital Financial Services चे संचालक असून, २०१५ मध्ये शिल्पा-राज यांनी कंपनीचा विस्तार करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली. तक्रारीनुसार, ही रक्कम व्यवसायाऐवजी वैयक्तिक खर्चासाठी वापरली गेली. व्यवहाराचा तपशील कोठारी यांनी १२ टक्के व्याजदराने ७५ कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते.शिल्पा-राज यांनी टॅक्स बचतीसाठी पैसे, गुंतवणूक स्वरूपात देण्याचा सल्ला दिला.त्यानंर एप्रिल २०१५ मध्ये ३१ कोटी आणि सप्टेंबर २०१५ मध्ये २८ कोटी रुपये गुंतवले गेले.या गुंतवणुकीवर शिल्पा आणि राज यांनी वैयक्तिक हमी दिली होती. वादाची सुरुवात २०१६ मध्ये शिल्पा शेट्टी यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीविरुद्ध १.२८ कोटी रुपयांच्या दिवाळखोरीचे प्रकरण उघड झाले. कोठारी यांना याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, परिणामी त्यांची गुंतवणूक बुडाली. पैसे परत न मिळाल्याने कोठारी यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाची रक्कम १० कोटींपेक्षा जास्त असल्याने ते आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. शिल्पा-राज यांचा दावा शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. न्यायालयीन सुनावणीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.