शिल्पा आणि सुनील शेट्टी एकत्र; चाहत्यांनी केली ‘धडकन’च्या सीक्वेलची मागणी

Sunil Shetty and Shilpa Shetty| अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी यांची जोडी ‘धडकन’ या चित्रपटात झळकली होती. 2000 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिट झाला होता. आजही हा चित्रपट आणि त्यातील गाण्याची क्रेझ आहे. नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी एकत्र पाहायला मिळाले. पापाराझींनी या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. या कार्यक्रमात शिल्पा आणि सुनील शेट्टी यांनी एकत्र फोटोसाठी पोझसुद्धा दिली.
यावेळी फोटोग्राफर्सनी शिल्पा शेट्टीला अंजली नावाने हाक मारायला सुरुवात केली. त्यावेळी शिल्पा शेट्टीही हसली. धडकन या चित्रपटात शिल्पाने सुनील शेट्टीच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. ज्यात तिचे नाव अंजली होते. तर सुनील शेट्टीचे नाव देव होते. याशिवाय यात अक्षय कुमारची देखील मुख्य भूमिका होती.
View this post on Instagram
या कार्यक्रमासाठी शिल्पाने साडी नेसली होती, तर सुनील शेट्टीने पांढरा शर्ट आणि त्यावर ब्लेझर-पँट परिधान केला होता. या चित्रपटातील शिल्पा आणि सुनील शेट्टी यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. सध्या या कार्यक्रमातील त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेकांनी ‘धडकन 2’ बनवण्याची मागणी केली.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एक नेटकऱ्याने ‘जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, कृपया धडकन 2 बनवा,’ असे म्हंटले. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले को, ‘आम्हाला तुम्हाला एका चित्रपटात एकत्र पाहायला आवडेल.’
शिल्पाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे तर, शिल्पा ‘केडी: द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटात दिसणार आहे. तर सुनील शेट्टी ‘हंटर 2’ आणि ‘लेजंड ऑफ सोमनाथ’ या चित्रपटात दिसणार आहे.





