Shikrapur Accident | ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; ट्रक चालक फरार

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – कोंढापुरी (ता. शिरूर) येथील कासारी फाटा नजीक असेलल्या पुणे अहिल्यानगर रस्त्याने जाणार्या दुचाकीला ट्रकने धडक दिली, त्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.निलेश खुळे हा रात्रीच्या सुमारास त्याच्या दुचाकीने (एमएच २८ बीवाय ८७१९) पुण्याकडून अहिल्यानगरच्या दिशेने चाललेला असताना समोरून आलेल्या एम एच १२ एफ झेड ७७१९ या ट्रकची निलेशच्या दुचाकीला धडक बसून अपघात झाला.
निलेश गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.दरम्यान ट्रक चालक फरार झाला, या अपघातात निलेश शाळीकराम खुळे (वय ३१, सध्या रा. कोरेगाव भीमा, मूळ रा. विसवी, ता. मेहकर, जि. बुलढाणा) याचा मृत्यू झाला असून याबाबत वसुदेव लक्ष्मण खुळे (वय ५६, सध्या रा. तळेगाव ढमढेरे, मूळ रा. विसवी) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांनी ट्रकच्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे करत आहेत.




