Pune District : शेवगा 100 रुपये किलो
Updated On:

चिंबळी : गेल्या काही दिवसांपूर्वी थंडीचा कडाका वाढला होता, त्यामुळे फळझाडे हिरवीगार होऊन फुलोर्यात आली होती त्यामुळे फळ उत्पादक समाधान व्यक्त करीत होते.
मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेवगा पिकावर ही परिणाम झाला असल्याने फुले गळू लागली असून शेवग्याला किलोला 100 रुपये भाव मिळत आहे.





