‘जर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’ ; पाकिस्तानी खासदाराचे विधान व्हायरल

Sher Afzal Khan Marwat। जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानभोवतीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून आयातीवर बंदी घातली आहे. तसेच, पाकिस्तानी ध्वज फडकवणाऱ्या जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
” तर मी इंग्लंडला पळून जाईन” Sher Afzal Khan Marwat।
पहलगाम हल्ल्यावर भारताकडून होणारा बदला आणि दोन्ही शेजारी देशांमधील युद्धाच्या शक्यतेचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत . त्यातच पाकिस्तानी राजकारणी शेर अफजल खान मारवत यांना “ते या प्रकरणात काय करतील”? असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी फक्त उत्तर दिले, ‘जर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन.’असे म्हटले. सध्या त्यांचे उत्तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेटिझन्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही युझर्सनी पाकिस्तानी राजकारण्यांनाही त्यांच्या सैन्यावर विश्वास नाही. असे म्हटले आहे. तर त्याच व्हिडिओमध्ये एका पत्रकाराने शेर अफझल खान मारवत यांना विचारले की, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठे संयम बाळगावा? यावर उत्तर देताना मारवत म्हणाले, ‘मोदी माझ्या मावशीचा मुलगा आहे की माझ्या म्हणण्यावरून ते मागे हटतील?’
शेर अफजल खान मारवत हे एक ज्येष्ठ पाकिस्तानी राजकारणी आहेत जे तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) शी संबंधित होते. तथापि, यापूर्वी त्यांनी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर अनेक वेळा टीका केली होती, ज्यामुळे इम्रान खान यांनी त्यांना पक्षातील महत्त्वाच्या पदांवरून काढून टाकले.
सलग दहाव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन Sher Afzal Khan Marwat।
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सलग दहाव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्याने दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानविरुद्धच्या नवीन उपाययोजनांमध्ये भारताने आयात, येणाऱ्या मेल आणि पार्सलवर नवीन निर्बंध लादले आहेत आणि सर्व भारतीय बंदरांवर पाकिस्तानमधून येणाऱ्या जहाजांच्या डॉकिंगवर बंदी घातली आहे. यापूर्वी, भारताने १९६० चा सिंधू पाणी करार रद्द केला होता आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व अल्पकालीन व्हिसा रद्द केले होते आणि त्यांना २९ एप्रिलपर्यंत त्यांच्या देशात परतण्यास सांगितले होते. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानने शिमला करार रद्द करण्याची आणि भारतीय विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली. भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्रही बंद केले आहे.





