Sheikh Mohammed bin Abdulrahman Al Thani : कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल्लरहमान अल थानी घेणार ट्रम्प यांची भेट
कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल्लरहमान अल थानी (Sheikh Mohammed bin Abdulrahman Al Thani) हे ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी अमेरिकेत गेले असून सोमवारी ट्रम्प आणि अल थानी यांची व्हाइट हाउसमध्ये भेट होणार आहे.

Sheikh Mohammed bin Abdulrahman Al Thani : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष संपवण्याच्या दृष्टीने कतारने मध्यस्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल्लरहमान अल थानी (Sheikh Mohammed bin Abdulrahman Al Thani) हे ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी अमेरिकेत गेले असून सोमवारी ट्रम्प आणि अल थानी यांची व्हाइट हाउसमध्ये भेट होणार आहे.
अमेरिका-इराणमध्ये इराणच्या आण्विक कार्यक्रमावरून असलेल्या मतभेदांवर मध्यस्थीचा प्रस्ताव कतारच्यावतीने देण्यात आला असून इराणकडून या प्रस्तावाचा इराण विचार करत असल्याचे रविवारी सांगण्यात आले. मात्र जोपर्यंत अमेरिकेकडून इराणच्या मुख्य अटी मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत ट्रम्प प्रशासनाशी वाटाघाटी करण्यास इराण राजी नाही.
युद्धबंदी करारासाठी इराणकडून याच अटींचा आग्रह धरला जातो आहे. या अटींमध्ये इराणच्या बंदरांची नाकाबंदी उठवणे, तेलविक्रीवरील निर्बंध उठवणे, विदेशातील गोठवलेल्या ठेवी खुल्या करणे, युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणे आणि संपूर्ण प्रदेशात इराणविरुद्धचे शत्रुत्व समाप्त करण्याच्या समावेश आहे.
कतारच्या पंतप्रधानांशी (Sheikh Mohammed bin Abdulrahman Al Thani) जरी ट्रम्प यांची भेट ठरली असली, तरी अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे.
जोपर्यंत इराणबरोबर वाटाघाटी आणि समर्थ युद्धबंदी करार होत नाही, तोपर्यंत हल्ले पुन्हा सुरू करण्याची गरज भासण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पण जर इराणवरचे हल्ले पुन्हा सुरू करावे लागले, तर त्यासाठी ३८ पूलांचे लक्ष्य निश्चित करण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.






