शेख हसीना मायदेशी परतल्यानंतर त्यांच्यासोबत काय होणार? ; काय सांगतो बांगलादेशचा कायदा? जाणून घ्या

Sheikh Hasina Extradition । बांगलादेशातील सत्तापालटानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना 5 ऑगस्ट 2024 रोजी भारतात आल्या होत्या. तेव्हापासून ते आजतागायत त्या भारतात वास्तव्यास आहेत. तर दुसरीकडे अराजकता पसरलेली बांगलादेशची सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार देशाची सूत्रे हाती घेत आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाबाबत बांगलादेश सरकारने भारत सरकारला पत्र लिहिले आहे.
याबाबत भारत सरकारकडून सध्या कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. परंतु प्रत्यार्पण करण्यायोग्य फौजदारी खटल्यांबाबत 2013 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या करारामुळे भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशला परत पाठवू शकते. शेख हसीना बांगलादेशात गेल्यास त्यांचे काय होईल? याबाबत बांगलादेशचे कायदे काय आहेत? याविषयी जाणून घेऊ…
मायदेशी परतल्यानंतर शेख हसीना यांना कारवाईला सामोरे जावे लागणार ?
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशमध्ये एकूण 51 कायदेशीर खटले दाखल आहेत. त्यापैकी 42 प्रकरणे खुनाचे आहेत. जे खूप गंभीर आहेत. अशा परिस्थितीत शेख हसीना जर बांगलादेशला परतल्या. त्यामुळे त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांमध्ये कारवाई होऊ शकते. प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन बांगलादेश सरकार त्यांना तुरुंगातही पाठवू शकते.
‘ही’ शिक्षा होऊ शकते Sheikh Hasina Extradition ।
शेख हसीना यांच्यावर 42 खुनाचे गुन्हे दाखल आहेत. अशा स्थितीत बांगलादेशी कायद्यावर नजर टाकली तर त्यांच्यासाठी ते खूप कठीण होऊ शकते. बांगलादेशात खुनाच्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा आहे. बांगलादेश दंड संहिता, 1860 अंतर्गत, खुनाच्या गुन्ह्यासाठी मृत्यूदंड देखील दिला जाऊ शकतो. त्यामुळे यासोबतच जन्मठेप आणि दंडही होऊ शकतो.
भारताकडे कोणता पर्याय आहे? Sheikh Hasina Extradition ।
भारत आणि बांगलादेश यांच्यात 2013 मध्ये प्रत्यार्पण करार झाला होता. ज्यामध्ये २०१६ साली सुधारणा करण्यात आल्या होत्या. या करारानुसार एखाद्या व्यक्तीचा गुन्हा राजकीय स्वरूपाचा असेल तर कोणताही देश प्रत्यार्पणाला नकार देऊ शकतो. पण या करारानुसार खुनासारखा गुन्हा राजकीय गुन्हा म्हणून गणला जाणार नाही. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आता यावर भारत सरकार काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.





