शहनाज गिलचा देसी लुक! पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुलले अभिनेत्रीचे सौंदर्य

Shehnaaz Gill | पंजाबी अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिलला बिग बॉसमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. आपल्या प्रेमळ स्वभावाने तिने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करते. सध्या तिच्या देसी लुकमध्ये फोटोशूट केले आहे. यातील तिच्या लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शहनाजने शेअर केलल्या फोटोत तिने फुल स्लीव्हजसह पिवळ्या शेडचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. या साध्या लुकमध्ये देखील ती फारच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत. सध्या तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले असून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
जर आपण शहनाज गिलच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो तर, अभिनेत्री कुश कपिलासोबत ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. सध्या अभिनेत्री तिच्या ‘सब फर्स्ट क्लास’ या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. शहनाजचे चाहते तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हेही वाचा:
सोनिया गांधींनी दिला विधानसभा निवडणुकीचा विजयाचा फॉर्म्युला ; म्हणाल्या,”वातावरण आमच्या बाजूने, पण…”





