मुंबई – बिग बॉस 13 फेम शहनाज गिल टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठे नाव बनले आहे. शहनाज रोज यशाची नवी उंची गाठताना दिसत आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी शहनाज नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असती. नुकतंच, अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर आकाउंटवर एक फोटो शेअर केला असून, सध्या तिचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री पारंपरिक पोशाखात कॉटवर बसून चहाची चुस्की घेताना दिसत आहे. या फोटोंमधील अभिनेत्रीच्या साधेपणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. मस्टर्ड कलरचा सूट घातलेली शहनाज चहाचा घोट घेत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोंवर केवळ चाहतेच नाही तर अभिनेता विकी कौशलनेही कमेंट केली आहे. बिग बॉस 13 फेम शहनाज गिल ही पूर्णपणे देसी गर्ल आहे आणि आजकाल ती तिच्या गावातील साध्या जीवनाचा आनंद घेत आहे. इस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंजाबची धडकन शहनाज कॉटवर बसलेली आहे. अभिनेत्रीने फोटोला एक कॅप्शन देखील दिल आहे. “हे मित्रांनो, चहा घ्या…” या फोटोंमधील अभिनेत्रीच्या साधेपणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तर अभिनेता विक्की कौशलने कमेंट सेक्शनमध्ये चायला पंजाबीमध्ये ‘चा’ लिहून कमेंट घेतली आहे. अभिनेत्रीचे हे फोटो चाहत्यांनाही वेड लावत आहेत. कुणीतरी अभिनेत्रीच्या कौतुकात लिहिलं “वाह! खरं तर तू हे केलंस!! किती मस्त वाटत असेल. असं फॅन्स म्हणत आहे.