Shefali Jariwali : ‘काटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री ‘शेफाली जरीवाला’चे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. दि. 27 जून रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने शेफालीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. तिच्या निधनाच्या बातमीने चाहते आणि संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. शेफालीच्या मृत्यूनंतर तिचा पती परागने पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोठं विधान केलंय. ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं. सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी शेफाली ‘व्हिटॅमीन सी’ आणि ‘गुल्टोथिओन’ ही दोन औषधं घेत होती. याशिवाय शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, “गेल्या पाच-सहा वर्षांपासून ती तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती. ती एंटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती. शेफाली दोन औषधं घ्यायची, ज्यात ‘व्हिटॅमीन सी’ आणि ‘गुल्टोथिओन’ हे घटक समाविष्ट होते. या औषधांचा हृदय विकाराशी काही संबंध नाही. ही औषधं चेहरा उजळ व्हावा म्हणून घेतली जातात. त्यामुळे याचा परिणाम फक्त चेहऱ्यावर होतो. शेफाली खूप फिट होती आणि तिने कधीच कोणत्या आजाराचा उल्लेख केला नव्हता.” असं देखील सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सध्या शेफालीच्या मृत्यू प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार अभिनेत्रीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण अभिनेत्रीचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल. दरम्यान, शेफाली हिने दिलेली एक जुनी मुलाखत तुफान चर्चेत आली आहे. ट्रोलिंगवर शेफाली म्हणाली होती, ‘मी इंडस्ट्रीमध्ये 20 वर्षांपासून आहे. कांटा लगा गाण्यानंतर माझ्यावर अनेकांनी टीका केली. तेव्हा सोशल मीडिया नव्हतं समोर टीका केली जायची…, टीका करणाऱ्या लोकांचा चेहरा आपल्याला माहिती नसतो. फेक अकाउंटवरुन ट्रोल केलं जातं. त्यामागची खरा व्यक्ती तुम्हाला कळणार नाही. कांटा लगा गाण्यानंतर अनेक संकटांचा सामना केला असल्याचं तिने सांगितलं. या गाण्यानंतर नातेवाईक मला म्हणाले मुलीने हे काय केलं आहे. नाव खराब केलंय…’ कोणी तर अशी अफवा पसरवली की शेफालीच्या भावाने तिला मारलं आहे. टॅटू काढल्यामुळे मला कॅन्सर झाला आणि त्यामुळे माझं निधन झालं. अफला सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. तेव्हा मोबाईल नव्हते… शेफालीचं निधन झालं…. ही अफवा सर्वत्र परसली..’ असं देखील शेफाली म्हणाली होती. शेफालीच्या करिअरची सुरुवात एका म्युझिक व्हीडिओतून झाली. त्यावेळी ती इंजीनिअरिंग करत होती. शेफालीचे वडील चार्टर्ड अकाउंटंट, तर आई स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होती. ‘कांटा लगा’ गाण्याच्या रिमेक व्हर्जनमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली शेफाली नंतर ‘कांटा लगा’ म्हणूनच ओळखली जाऊ लागली. ही ओळख अखेरपर्यंत तिच्या सोबत राहिली. अनेक मुलाखतीत बोलताना तिने या ओळखीचा आपल्याला अभिमान वाटतो, असंही सांगितलं होतं.