Shefali Jariwala : कांटा लगा…गर्ल ‘शेफाली जरीवाला’चा स्विमिंग पूलमधील हॉट अंदाज !

Updated On:
Photo 1

Shefali Jariwala – बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या 2002 मधील ‘कांटा लगा…’ या म्युझिक व्हिडीओला खुपच प्रसिद्धी मिळाली होती आणि देशभरात शेफालीला “कांटा लगा’ गर्ल अशी ओळख मिळाली.

यानंतर शेफाली “बिग बॉस 13′ मधून घराघरात पोहोचली. या शोमधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. शेफाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.

शेफाली जरीवालाचे सोशल मीडिया अकाउंट फोटोशूटने भरलेले आहे. नुकतेच शेफाली जरीवालाने इंस्टाग्रामवर स्वतःचे नवीन लूक मधील काही फोटो शेअर केले असून, यावेळी तिने आपली कर्व्ही फिगर फ्लॉन्ट केली आहे.

शेफालीने स्विमिंग पूलजवळ बिकिनीमध्ये आराम करतानाचे तिचे फोटो पोस्ट केले आहेत. ती नारंगी रंगाच्या बिकिनीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिच्या प्रत्येक हावभावाने चाहते त्यांचे मन फ्रेश करत आहेत.

शेफालीला स्विमिंग पूलमध्ये आराम करताना पाहून चाहते आगीचे इमोजी शेअर करत असून, लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. तिच्या या बोल्ड लूकने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

शेफालीने केसांचा बन बनवला असून हलका मेकअप केला आहे. तसेच तिने तिचा लूक सनग्लासेसने पूर्ण केला आहे. ती हसत कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. चाहते अभिनेत्रीच्या टोन्ड फिगरचे कौतुक करत आहेत.

ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमध्ये तिच्या परफेक्ट फिगरचे प्रदर्शन करते. ती तिच्या चाहत्यांना फिटनेसच्या बाबतीत प्रेरणा देखील देत असते. शेफालीला पाहून कोणीही म्हणणार नाही की ती 42 वर्षांची आहे.

या वयातही अभिनेत्री तिच्या मादक सौंदर्याने आणि किलर लूकने चाहत्यांची मने जिंकत आहेत. शेफालीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “तू नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहेस.” अशा कमेंट फॅन्स करत आहेत.

शेफालीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती गेल्या अनेक महिन्यांपासून पडद्यापासून दूर आहे. ती शेवटचा टीव्ही शो ‘शैतानी रिच्युअल्स’ मध्ये झळकली होती.

अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत असते. इंस्टाग्रामवर तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग असून, अभिनेता सतत आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहते.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र