शेफाली जारीवालाचा ‘या’ गंभीर आजाराने मृत्यू? स्वतःच केला होता खुलासा, काय म्हणाली होती पाहा…

Shefali Jariwala’s cause of death : कांटा लगा गाणं आणि बिग बॅास १३ साठी प्रसिद्ध असलेल्या शेफाली जरीवाला हिचे काल २७ जून रोजी हृदयविकाराच्या झटकाने निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तिच्या निधनाची बातमी समजताच तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवाला मोठा धक्का बसला आहे. शिफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटकाने झाल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत. असे असले तरी तिच्या मृत्यू नेमके कारण अद्यापर्यंत स्पष्ट झाले नसून, आता तिच्या आजाराची चर्चा सुरू झाली आहे.
२७ जून रोजी रात्री शेफालीला अंधेरीतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण आयसीयूमध्ये नेण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. तिच्या निधनाची बातमी तिच्या कुटुंबीयांना समजात ते देखील रुग्णालयात पोहचले.
तिच्या आईचे आणि कुटुंबातील सदस्यांचे हृदयद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमी वयात मुलीच्या निधनाच्या वृत्ताने तिच्या आईवर मोठा आघात झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी पुढील तपासासाठी शेफाली जरीवालाच्या घरी पोहचले. फाली जरीवालीच्या अचानक निधनाच्या बातमीने कलाविश्वातील तिच्या मित्रपरिवाराला जबरदस्त धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपले दुःख आणि शोक व्यक्त केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शेफाली १५ वर्षांपासून एका आजाराने ग्रस्त होती. एपिलेप्सीचा या आजाराचा तिला त्रास होत होता. यामुळे अनेकदा ताणतणाव आणि चिंतेमुळे तिला झटके यायची. या समस्येमुळे तिचे वजन वाढले होते. अशी माहिती आता समोर आली आहे.
एपिलेप्सी म्हणजे काय?
एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल आणि मेंदूचा आजार आहे. यामध्ये वारंवार झटके येऊ लागतात. प्रत्येक रुग्णामध्ये त्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात, असे सांगण्यात येत आहेत.
शेवटची पोस्ट
काही दिवसांपूर्वी शेफालीने तिच्या इंन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. ती तिची शेवटची पोस्ट ठरली. तिने या स्टोरीत तिचा ग्लॅमरस फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे. बेबी ब्लिंग इट ऑन बेबी, असे कॅप्शन तिने फोटो खाली दिले होते. तिच्या या शेवटच्या फोटोवर चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहेत.
हेही वाचा : “मी शांत आहे म्हणजे…”; घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांना ऐश्वर्याने चांगलेच सुनावले





