#VineshFogat : आगामी स्पर्धांसाठी विनेश सज्ज
Updated On:

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील अपयशानंतर वर्तनावरून निलंबित केलेल्या भारताच्या कुस्तीपटू विनेश फोगटवरील कारवाई मागे घेण्यात आल्याने तिला दिलासा मिळाला आहे.
आता नव्या उमेदीने यंदाच्या मोसमातील विविध स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करण्यासाठी ती सज्ज बनली आहे. टोकियोत जे काही घडले तो भूतकाळ होता. त्यामुळे मला मनस्तापही खूप झाला.
आता हे सगळे विसरून यंदाच्या तसेच पुढील मोसमासाठी कसून मेहनत करणार आहे. अपयशाचा विचार करण्यापेक्षा मी भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज आहे, असे विनेशने सांगितले. आगामी स्पर्धामध्ये खेळातील कुमकुवत दुवे दूर करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, असेही ती म्हणाली.





