‘शाकाहारी होती, मग चिकन कधीपासून खाऊ लागली?’; उर्वशी पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Urvashi Rautela | अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. तिची अशी एखादी कृती जी चाहत्यांच्या निशाण्यावर येते. यावेळी देखील तिच्या एका कृतीकडे नेटकऱ्यांनी लक्ष वेधले आहे. एका जाहिरातीत उर्वशी चिकन खाताना दिसल्याने अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
उर्वशीने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत ती शुद्ध शाकाहारी आहे असं म्हणाली होती. अशातच उर्वशीने एका चिकन फूड ब्रँडची जाहिरात करतानाच मांसाहार केल्याने अनेकांनी तिला खोटारडी म्हणत ट्रोल केलं आहे. यामध्ये, काही लोकांनी तिला, ‘ती श्रावणात चिकन कशी खाऊ शकते?’ असाही सवाल केला आहे.
View this post on Instagram
काहींनी असेही म्हटले की ती ‘शाकाहारी होती, मग ती चिकन कधीपासून खाऊ लागली?’ अनेकांनी उर्वशीची ही जाहिरात बंद करावी अशी मागणी केली आहे. यावर अद्याप उर्वशीची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. Urvashi Rautela |
उर्वशी रौतेलाच्या कामबद्द्दल बोलायचे झाले तर, जानेवारीमध्ये उर्वशीने बालकृष्ण आणि संजय दत्त यांच्यासोबत ‘डाकू महाराज’ या तेलुगू चित्रपटात काम केले होते. Urvashi Rautela |
हेही वाचा :





