Shefali Jariwali | Glutathione | Vitamin C : ‘काटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री ‘शेफाली जरीवाला’चे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. दि. 27 जून रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने शेफालीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. तिच्या निधनाच्या बातमीने चाहते आणि संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. शेफालीच्या मृत्यूनंतर तिचा पती परागने पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोठं विधान केलंय. ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं.
सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी शेफाली ‘व्हिटॅमीन सी’ आणि ‘गुल्टोथिओन’ ही दोन औषधं घेत होती. याशिवाय शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, “गेल्या पाच-सहा वर्षांपासून ती तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती. ती एंटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती.
शेफाली दोन औषधं घ्यायची, ज्यात ‘व्हिटॅमीन सी’ आणि ‘गुल्टोथिओन’ हे घटक समाविष्ट होते. या औषधांचा हृदय विकाराशी काही संबंध नाही. ही औषधं चेहरा उजळ व्हावा म्हणून घेतली जातात. त्यामुळे याचा परिणाम फक्त चेहऱ्यावर होतो. शेफाली खूप फिट होती आणि तिने कधीच कोणत्या आजाराचा उल्लेख केला नव्हता.” असं देखील सांगण्यात आलं आहे.
सध्या सौंदर्यप्रेमी तरुणाईमध्ये एक नवीन आरोग्य-ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसतोय. त्वचेचं उजळपण, तरुणपण टिकवून ठेवणं आणि संपूर्ण शरीराचं डिटॉक्सिफिकेशन या उद्देशाने लोक ‘व्हिटॅमिन C आणि ग्लुटाथिओन’ या अँटीऑक्सिडंट्सकडे वळत आहेत.
मात्र, हे सप्लिमेंट्स घेताना योग्य माहिती आणि वैद्यकीय सल्ला घेणं अत्यावश्यक आहे, अन्यथा त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
‘व्हिटॅमिन C’ नेमकं काय आहे?
व्हिटॅमिन C, ज्याला Ascorbic Acid असंही म्हणतात, हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं पोषकतत्त्व आहे. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच त्वचेला उजळ, टवटवीत आणि कोलाजेनयुक्त बनवण्यास मदत करतं. विशेषतः अॅन्टी-एजिंग साठी याचा वापर वाढला आहे.
स्वरूप: गोळ्या, पावडर, सिरप, इंजेक्शन.
फायदे: त्वचा उजळवणं, इम्युनिटी वाढवणं, कोलाजेन निर्मिती, वृद्धत्व लांबवते (अँटीऑक्सिडंट) , पिंपल्स/डागांवर उपयोगी.
साइड इफेक्ट्स: अति सेवनाने अॅसिडिटी, जुलाब, किडनी स्टोनचा धोका.
ग्लुटाथिओन म्हणजे काय?
‘ग्लुटाथिओन’ हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारं शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. मात्र वय वाढल्यावर, किंवा स्ट्रेस व प्रदूषणामुळे त्याचं प्रमाण घटतं. त्यामुळे सप्लिमेंट्सच्या स्वरूपात ग्लुटाथिओन घेणं अनेकांना फायदेशीर वाटतं. त्वचा उजळवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि काही लोक याला इंजेक्शनद्वारे त्वचा गोरी करण्यासाठी वापरतात.
फायदे (त्वचा उजळवण्याचे गुण): मेलानिनचं उत्पादन कमी करतं, स्किन टोन हलकी करण्यासाठी वापरलं जातं, सगळ्यात जास्त cosmetic use साठी प्रसिद्ध (सौंदर्य प्रसाधने या साठी वापर).
डिटॉक्सिफिकेशन: लिव्हर साफ करतं. शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकतं.
साइड इफेक्ट्स (उच्च मात्रेत घेतल्यास): त्वचेवर पांढरे डाग, अॅलर्जी (त्वचेला खाज), श्वासोच्छवासाचा त्रास (इंजेक्शनने घेतल्यास), गर्भवती महिलांनी वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे.
स्वरूप: गोळी, इंजेक्शन.
सावधगिरी आवश्यक !
त्वचेचं गोरेपण हे फक्त सौंदर्याचं मानक नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते, “ग्लुटाथिओन आणि व्हिटॅमिन C हे फायदेशीर असले, तरी त्याचा अति वापर घातक ठरू शकतो. सौंदर्याच्या नावाखाली शरीरावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अन्यथा त्याच्या गंभीर परिणामांचा सामना करावा लागतो.
दरम्यान, अनेक स्किन क्लिनिकमध्ये ‘Glutathione + Vitamin C drips’ उपलब्ध असले तरी, काही देशांत या पद्धतीवर (जसे फिलिपिन्स, हाँगकाँग) बंदी आहे. तसेच उपचारांची किंमत देखील ₹2000 ते ₹10000 पर्यंत जाते.