Rahul Modi On Shraddha Kapoor: ‘ती इथे नाहीये…’; श्रद्धा कपूरचा उल्लेख करताच राहुल मोदीचा भन्नाट अंदाज, व्हिडीओ झाला व्हायरल
Rahul Modi On Shraddha Kapoor श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या डेटिंगच्या चर्चा २०२४ पासून सुरू झाल्या होत्या. दोघांना पहिल्यांदा मुंबईत एका डिनर डेटदरम्यान एकत्र पाहण्यात आले होते. त्यानंतर अनेक कार्यक्रम, पार्टी आणि इव्हेंटमध्ये हे दोघे एकत्र दिसले. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले.

Rahul Modi On Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी हे सध्या बॉलिवूडमधील चर्चित जोडप्यांपैकी एक मानले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. चाहतेही या दोघांकडून लवकरच लग्नाची खुशखबर मिळण्याची वाट पाहत आहेत. अशातच राहुल मोदीचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अलीकडेच राहुल मोदी यांना पापाराझींनी मुंबईत स्पॉट केले. ते एका ठिकाणाहून बाहेर पडत असताना फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ घेण्यास सुरुवात केली. यावेळी राहुलने अतिशय मजेशीर अंदाजात पापाराझींशी संवाद साधला. त्याचा हा अंदाज पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले. (Rahul Modi On Shraddha Kapoor)
राहुल मोदी यांनी पापाराझींना विचारलं, “कुणाला शोधताय? ती इथे नाहीये…” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे श्रद्धा कपूरचा उल्लेख केला. राहुलचे हे बोलणे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्ससह इतर लोकांनाही हसू आवरता आले नाही. त्यानंतर पापाराझींनीही मजेशीर उत्तर देत म्हटलं, “आम्ही तुमच्यासाठीच आलो आहोत.” यावर राहुलने हसतच “माझ्यासाठी का आलात?” असा प्रश्न विचारला. या हलक्या-फुलक्या संवादाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या डेटिंगच्या चर्चा २०२४ पासून सुरू झाल्या होत्या. दोघांना पहिल्यांदा मुंबईत एका डिनर डेटदरम्यान एकत्र पाहण्यात आले होते. त्यानंतर अनेक कार्यक्रम, पार्टी आणि इव्हेंटमध्ये हे दोघे एकत्र दिसले. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले. (Rahul Modi On Shraddha Kapoor)
मात्र, श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांनी अद्याप त्यांच्या नात्याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. तरीही सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी चर्चेत असतात. चाहत्यांनाही या जोडीची केमिस्ट्री खूप आवडते. (Rahul Modi On Shraddha Kapoor)
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर श्रद्धा कपूरला शेवटचं स्त्री २ या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव सोबत पाहण्यात आलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आगामी काळात श्रद्धा अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार तिने ‘ईथा’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून त्यात तिच्यासोबत रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ती ‘नागिन’ आणि ‘स्त्री ३’ या चित्रपटांमध्येही झळकणार असल्याची चर्चा आहे. (Rahul Modi On Shraddha Kapoor)





