शत्रुघ्न सिन्हा कोकिला बेन हॉस्पिटलमध्ये दाखल, मुलगी आणि जावई पोहचले

गेल्या अनेक दिवसांपासून सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. या दोघांनी 23 जून रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केले, ज्यामध्ये कुटुंबापासून जवळच्या मित्र आणि नातेवाईकांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला.
View this post on Instagram
आता लग्नाला तब्बल ५ दिवस उलटले असताना शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीने सर्वांनाच हैराण केले आहे. सोनाक्षी आणि झहीर त्यांना भेटण्यासाठी मुंबईतील कोकिला बेन हॉस्पिटलमध्ये पोहोचले, यादरम्यानचा एक व्हिडिओही समोर आला आहे. चाहते याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत चिंता व्यक्त करत आहे.
रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या धामधुमीनंतर शत्रुघ्न सिन्हा रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले.त्यांच्यासोबत झहीर आणि सोनाक्षी त्यांच्या कारमधून हॉस्पिटलमधून निघताना दिसले. त्यांच्या बाबत अशीही माहिती समोर येत आहे ते पूर्णपणे बरे आहेत. मात्र, याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
नुकतेच सोनाक्षीच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. यामध्ये सोनाक्षीचे आई-वडील तिच्यासोबत उभे असल्याचे दिसले. अलीकडेच सोनाक्षीने तिच्या लग्नाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये वडील शत्रुघ्न सिन्हा देखील दिसत होते.





