Shashi Tharoor : काँग्रेसचे खासदार आणि आपल्या स्पष्ट बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जाणारे शशि थरूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण ठरलं आहे करण जोहर आणि मलायका अरोरा यांचा एक व्हायरल व्हिडिओ. व्हिडिओत काय दिसतंय? अलीकडे सोशल मीडियावर ‘Pitch To Get Rich’ या शोचा एक क्लिप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फिल्ममेकर करण जोहर एका स्पर्धकाला म्हणताना दिसतात की, “तुझं बोलणं अगदी शशि थरूरसारखं वाटतं.” यावर अभिनेत्री मलायका अरोरा लगेचच सहमती दर्शवते आणि हसते. थरूर यांची मजेशीर प्रतिक्रिया हा व्हिडिओ थेट शशि थरूर यांच्या नजरेत आला. त्यांनी तो एक्स वर रीपोस्ट करत लिहिलं, “करण जोहर आणि मलायका अरोराला सांगायचं आहे की, आपण दोघांनी मला भेटून खूप काळ लोटला आहे!” थरूर यांच्या या विनोदी ट्विटने चाहत्यांची मने जिंकली. काही क्षणांतच त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली. लोकांच्या प्रतिक्रिया नेटिझन्सनी थरूर यांच्या पोस्टवर मजेदार कमेंट्स केल्या. कुणी लिहिलं, “सर, करणला तुमची पर्सनॅलिटी खूप आवडते,” तर दुसर्याने म्हटलं, “थरूर साहेब, तुमचं इंग्रजीच नाही, तुमचं सेन्स ऑफ ह्यूमर ही क्लासी आहे.” यापूर्वीही बॉलिवूड विषयावर बोलले होते थरूर ही पहिलीच वेळ नाही जेव्हा शशि थरूर बॉलिवूडशी संबंधित चर्चेत आले आहेत. काही काळापूर्वी त्यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खान दिग्दर्शित वेब सीरिज ‘The Bad’s of Bollywood’ चे कौतुक केलं होतं. त्यांनी आर्यनच्या दिग्दर्शनाचं आणि शाहरुखच्या पाठिंब्याचं कौतुक करत म्हटलं होतं की, “ही सीरिज भारतीय मनोरंजन जगताला नवी दिशा देते.” ट्रोल्सना दिलं उत्तर या पोस्टनंतर काही यूजर्सनी त्यांच्यावर “पेड प्रमोशन” केल्याचा आरोप केला होता. त्यावर थरूर यांनी कठोर भाषेत उत्तर दिलं,“मी विकाऊ नाही. मी कधीही माझ्या मतासाठी किंवा समीक्षा देण्यासाठी पैसे घेतलेले नाहीत.” शशि थरूर यांच्या बुद्धिमान आणि विनोदी प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांचं नाव गाजतंय. करण जोहर आणि मलायका अरोरा यांच्या व्हिडिओला दिलेलं त्यांचं हे हलकंफुलकं उत्तर नेटिझन्सना फारच भावलं आहे.