काँग्रेसवरील निष्ठेच्या प्रश्नावर शशी थरूर यांचे उत्तर ; म्हणाले, ‘जर भारत मेला तर कोण वाचेल?’

Shashi Tharoor । काँग्रेस कार्यकारिणी समिती (CWC) सदस्य शशी थरूर यांनी, “राष्ट्र सर्वोच्च असून पक्ष हे देशाला चांगले बनवण्याचे साधन आहेत.” असे म्हणत त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले आहे. तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी यावेळी बोलताना, “कोणत्याही पक्षाचे उद्दिष्ट एक चांगला भारत निर्माण करणे आहे आणि हे लक्ष्य साध्य करण्याच्या सर्वोत्तम मार्गावर पक्षांना मतभेद करण्याचा अधिकार आहे”असे म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली.
राष्ट्रीय सुरक्षा प्रथम, राजकारण नंतर Shashi Tharoor ।
शशी थरूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांना,”कोची येथील एका शालेय विद्यार्थ्याने त्यांना राष्ट्रीय सुरक्षेबद्दल प्रश्न विचारला. थरूर म्हणाले, ‘मी या विषयावर सार्वजनिकरित्या बोलणे टाळतो, परंतु मला वाटले की या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे.’असे ते म्हणाले.
थरूर यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे उदाहरण देत, ‘जर भारत मेला तर कोण वाचेल?’असा सवाल करत त्यांच्यावर पक्षाच्या प्रति निष्ठा असण्याच्या त्यांच्यावरील टीकेला उत्तर दिले. पुढे ते म्हणाले की,”जेव्हा देशाचा विचार येतो तेव्हा राजकीय मतभेद विसरून एकत्र उभे राहिले पाहिजे.” शशी थरूर यांनी असेही म्हटले की,”सरकारला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे अनेक लोक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. परंतु ते या भूमिकेवर ठाम राहतील कारण ते राष्ट्रीय हिताचे आहे.” असे म्हणत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
माझ्या पक्षाला माझ्या विधानावर राग पण मी बरोबर Shashi Tharoor ।
त्यासोबतच, ‘राजकीय पक्ष हे देशाला चांगले बनवण्याचे एक साधन आहेत. पण जर एखादा निर्णय राष्ट्रीय हिताचा असेल तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे. माझ्या मते, भारत प्रथम येतो.’ असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा सरकारला पाठिंबा दिला आहे. तसेच थरूर यांनी कबूल केले की, काही पक्षाचे नेते त्यांच्या विधानांवर नाराज आहेत. ‘मी सरकार आणि सैन्याला पाठिंबा दिल्याने अनेक लोक माझ्यावर टीका करत आहेत, परंतु मी जे बोललो ते भारतासाठी योग्य आहे असे मला वाटते.’असे म्हणत त्यांनी आपली ठाम भूमिका पुन्हा एकदा सर्वांसमोर मांडली.
ते पुढे म्हणाले की, “जेव्हा ते ‘भारत’ म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ फक्त काँग्रेस किंवा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व भारतीयांचा असतो. संसदेत शेकडो पक्ष असू शकतात, परंतु राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर सर्वांनी एकत्र आले पाहिजे.” असे देखील म्हटले.





