नागरिकत्व कायद्यावर शशांक केतकर म्हणाला…
Updated On:

मुंबई – नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू झाली आहेत. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात होत असलेल्या घडामोडींवर मराठी अभिनेता शशांक केतकरनेही फेसबुकवर भल्ली मोठी पोस्ट लिहित आपलं मत मांडलं आहे.
शशांकने पोस्टमध्ये लिहिलं की, “आपण भारताचे नागरिक आहोत हे जर prove करावं लागणार असेल तर प्रॉब्लेम काय आहे!???नवीन कायदा हा भारतात अवैध पद्धतीने राहणाऱ्या लोकांसाठी आहे, कुठल्याही वैध भारतीय नागरिकासाठी नाही. एकीकडे भारताची लोकसंख्या खूप आहे, राहायला जागा नाही, म्हणून आपण रडायचं आणि दुसरीकडे इतकी वर्ष चालत आलेली घुसखोरी थांबवण्यासाठी काही नियम केले तर त्याला विरोध करायचा! हा प्रकार थांबला पाहिजे”.





