पुणे जिल्हा | शर्मिला पवार यांचा मतदारांशी संवाद
Updated On:

इंदापूर, (वार्ताहर)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापुर तालुक्यातील (गणेशवाडी) बावडा, पिंपरी बुद्रुक,टणू, येथे शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांचा गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता.यावेळी पवार यांनी मतदारांशी संवाद साधला.
याप्रसंगी शर्मिला पवार म्हणाल्या की, इंदापूर तालुका हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा तालुका आहे. कारण या तालुक्यात शरयू फौंडेशनच्या वतीने जलसंधारणाची व समाजपयोगी भरपूर अशी कामे केली आहेत,
तालुक्यातील कोणी जरी कार्यकर्ता किंवा सामान्य माणूस आला तरी तो मोकळा कधीच जात नाही. काही नाही दिलं तरी पाठीवरती एक प्रेमाची थाप सगळं काही देऊन जाते. यावेळी शरद पवार गटाचे कार्यकर्ते, नागरिक, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





