Share Market : कॅनरा बॅंकेसह पंजाब नॅशनल बॅंकेच्या शेअर्समध्ये उसळी
देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) गुरुवारी बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली, ज्यामुळे निफ्टी बँक निर्देशांकाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

Share Market : देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) गुरुवारी बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली, ज्यामुळे निफ्टी बँक निर्देशांकाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. आजच्या सत्रात बँक निफ्टी ५०९.८५ अंकांनी म्हणजेच ०.९० टक्क्यांनी वधारून ५७,२५२.४५ च्या पातळीवर बंद झाला.
गुरुवारी सकाळी बाजार उघडताना निर्देशांक ५६,७४२.६० अंकांवर होता, तिथून गुंतवणूकदारांच्या भक्कम पाठिंब्यामुळे बाजाराने दिवसभरात चांगली गती पकडली. बँक निफ्टीमधील एकूण १४ प्रमुख बँकांपैकी १३ बँकांचे शेअर्स आज नफ्यात बंद झाले, तर केवळ एका बँकेच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
आजच्या तेजीचे नेतृत्व सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या (Share Market) बँकांनी केले. यामध्ये कॅनरा बँक ३.३४ टक्क्यांच्या वाढीसह १२५.२ रुपयांवर बंद होत अव्वल स्थानी राहिली. त्यापाठोपाठ पंजाब नॅशनल बँक २.७२ टक्क्यांनी वधारून १०३.७ रुपयांवर पोहोचली.
खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक २.४२ टक्के आणि इंडसइंड बँक २.३५ टक्क्यांच्या वाढीसह १,०१८ रुपयांवर बंद झाली. याशिवाय युनियन बँक (२.२१%), कोटक महिंद्रा बँक (१.९५%), बँक ऑफ बडोदा (१.६८%) आणि यस बँक (१.०७%) यांनीही बाजाराला भक्कम आधार दिला.
दिग्गज बँकांचा विचार करता एचडीएफसी बँक ०.८३ टक्क्यांच्या वाढीसह ८१७ रुपयांवर, तर स्टेट बँक ऑफ इंडिया ०.५५ टक्क्यांच्या वाढीसह १,०२२.५० रुपयांवर बंद झाली. एयु बँक (०.८१%), फेडरल बँक (०.४४%) आणि आयसीआयसीआय बँक (०.२५%) हे शेअर्सही हिरव्या निशाणावर बंद झाले. गुरुवारच्या बाजारात केवळ ॲक्सिस बँक दबावाखाली दिसून आली. ॲक्सिस बँकेचा शेयर ०.५८ टक्क्यांच्या घसरणीसह १,३०१.९० रुपयांवर स्थिरावला.
ऑटो आणि आयटीमध्ये घसरण
आज निफ्टी 50 निर्देशांकाने 23,928.95 वर सुरुवात केली व दिवस अखेर 23,962.80 अंकांवर स्थिरावला. दिवसभराता (Share Market) केवळ 0.34 टक्क्यांची वाढ झाली. याबरोबरीने निफ्टी फिनसर्व्हिस, मिडकॅप 100, स्मॉलकॅप 100, एफएमसीजी, मेटल या सर्वच निर्देशांकांनी सकारात्मक व्यवसाय केला. मात्र निफ्टी ऑटो व निफ्टी आयटी या दोन निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली. निफ्टी आयटीमध्ये 83.95 अंकांची तर ऑटोमध्ये 57.05 अकांची घसरण नोंदविण्यात आली.





