Sharad Pawar : शरद पवारांची बड्या नेत्याने सोडली साथ; आज भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश
Sharad Pawar : समरजीत घाडगे अवघ्या काही महिन्यातच भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून ते आज भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.
विधानसभा निवडणूकीत तिकिट न मिळाल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, आता समरजीत घाडगे अवघ्या काही महिन्यातच भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत.
समरजीत घाटगे आज मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजपात पक्षप्रवेश करत आहेत. मात्र यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला धक्का बसला आहे. Sharad Pawar
समरजीत घाटगे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपूर्वी सुरू होती. या चर्चांवर त्यांनी शिक्कामोर्तब केला होता. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, ‘भाजपमध्ये बरेच दिवस माझा भाजपप्रवेश पेंडिंग होता. नगरपालिका आणि विशेषत: जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत.
त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून अधिवेशननंतर अधिकृत पक्षप्रवेश करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानुसार ८ तारखेला माझा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे,” हे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
‘शरद पवारांना माझी भूमिका सांगितली होती’ Sharad Pawar
याशिवाय महापालिका निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यातच मी शरद पवार यांना भेटून माझी भूमिका सांगितली होती. शरद पवार यांना सांगूनच मी पुढची पावलं उचलली आहेत, असेही घाटगे यांनी स्पष्ट केले. Sharad Pawar
तर फडणविसांचे कौतुकही त्यांनी केले होते. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या थोरल्या भावासारखे आहेत, त्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केलं आहे. मी पक्षातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा अनेकदा त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळते, याचही समाधान आहे,” असेही समरजीत घाटगे यांनी सांगितले.
हेही वाचा :
Pune District : सुरकुंडीतील जलजीवन योजनेचा बोजवारा; अपूर्ण कामांमुळे ग्रामस्थ त्रस्त






