Manoj Jarange : शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा; राज्यातील ‘या’ बड्या नेत्याचं मोठं विधान, थेट सांगितलं….

Sharad Pawar | Manoj Jarange – विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करतील, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शरद पवार हे मनोज जरांगे यांच्यासोबतच आहेत, हे आता स्पष्ट झाले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
ओबीसी आणि मराठा यांच्या आरक्षणाचे ताट वेगळे असावे, अशी स्पष्ट भूमिका आंबेडकर यांनी मांडली होती. जरांगे यांनी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मागितले आहे. आणि त्याला आमचा पूर्ण विरोध असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले होते.
राज्यामध्ये 55 लाख मराठ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र वाटप केले आहेत, ते देखील रद्द करण्यात यावे, अशी आमची मागणी असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. जो कोणी ओबीसी आहे, त्यांनी कागदपत्र दाखल केली, त्यांनी रितसर अर्ज दाखल केला तर त्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकते, असे देखील आंबेडकर यांनी म्हटले आहे.





