शरद पवारांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा
Updated On:

Sharad Pawar Z+ Security – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना राज्याची झेड प्लस सुरक्षा होती. आजपासून केंद्राची देखील झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. सीआरपीएफचे दहा जवान त्यांच्यासोबत असणार आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकींच्या दरम्यान शरद पवार यांचा राज्य दौरा सुरु होणार आहे. तसेच त्यांच्या निवासस्थानी नेतेमंडळींची, नागरिक, कार्यकर्त्यांची नेहमी वर्दळ असते. अशावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.





