Satara | कालेच्या विद्यालयाला एक कोटीं निधी देणार- शरद पवार

कराड, (प्रतिनिधी) – कर्मवीर अण्णांनी काले येथे उभारलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारत वास्तूचा प्रस्ताव ग्रामस्थांनी दिला होता. त्यावेळी त्यांना मी 20 लाखांची लोकवर्गणी गोळा करायला सांगितली. त्यांनी त्यापेक्षा जास्त निधी उभारला.
त्यात संस्थेने मोठी भर घालून अत्यंत सुंदर नूतन वास्तू उभारली. आता याठिकाणी आधुनिक संगणक कक्ष, प्रयोगशाळा, प्रशस्त सभागृह आदी अत्याधुनिक सुविधा उभारणीसाठी संस्थेतर्फे आणखी एक कोटींचा निधी देण्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.
काले (ता. कराड) येथे उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा संस्थेचे शरद पवार यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. विश्वजीत कदम, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, विभागीय अध्यक्ष संजीव पाटील,
संचालक ॲड. रवींद्र पवार, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, शाळेचे पहिले विद्यार्थी आर. एम. कोळी, कालेतील विकास पाटील, अजित देसाई, संजय देसाई, सागर देसाई, के. एन. देसाई, सौरभ कुलकर्णी, सज्जन साळुंखे, विजय यादव, विक्रम खटावकर, पाडुरंग पाटील, वसंतराव पाटील आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, राज्यात आमचे सरकार होते, त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण रयत शिक्षण संस्थेचा उचित सन्मान करण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद बजेटमध्ये करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार अजित पवार यांनी तब्बल पाच कोटींची तरतूद केली होती. त्यातील तीन कोटी रुपये संस्थेकडे वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यानच्या काळात परिस्थिती बदलल्याने उर्वरित दोन कोटींचा निधी अद्याप प्रलंबित आहे. मात्र, आता दोन महिन्यांनी आपण सर्वजण परिस्थिती बदलाल.
त्यानंतर राहिलेला निधी पूर्ण करून त्याचा उपयोग संस्थेसाठी करण्यात येईल. आता आधुनिकतेचा आधार घेऊन विद्यालयातील मुले, मुली देशपातळीवर कसे चमकतील,
या दृष्टीने नवनवीन उपक्रम हाती घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्याध्यापक राजेंद्र नांगरे- पाटील यांनी प्रास्तविक केले. विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. का





