सत्तेसाठी शरद पवार गटातील आमदार-खासदारांकडून पर्यायांची चाचपणी? ; ‘हे’ दोन पर्याय विचाराधीन

Sharad Pawar vs Ajit Pawar । राज्यात महायुतीला जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे. त्यात आता राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लांबत चालल्याने अनेक नेत्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, दुसरीकडे शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये सत्तेत जाण्यासाठी धडपड सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील आमदार आणि खासदार मंडळीची सत्तेत जाण्यासाठी चढाओढ सुरु असल्याचेही म्हटले जात आहे. सत्तेत जाण्यासाठी शरद पवार गटातील आमदार-खासदार अनेक पर्यायांची चाचपणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये धडपड Sharad Pawar vs Ajit Pawar ।
महायुती सरकारसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये धडपड सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी दोन पर्यायांचा विचार सध्या आमदार-खासदार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवारांच्या पक्षातील काही आमदार-खासदार सत्तेत जाण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा विचार करत आहे. भाजपसोबत जायचं, पण शरद पवार गटाचं अस्तित्व कायम ठेवायचं असं, एका गटाचं म्हणणं आहे. तर दुसऱ्या गटाचं मत आहे की, आपण अजित पवारांच्या गटात विलीन होऊन सरकारमध्ये जायचं. सत्तेत जाण्यासाठी या दोन पर्यांयावर शरद पवार गटातील नेत्यांचा विचार सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
सत्तेत जाण्याच्या हालचालींना वेग Sharad Pawar vs Ajit Pawar ।
दरम्यान, अजित पवार यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी गुरुवारी 84 वा वाढदिवस होता. यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलासोबत शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बडे नेतेही उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप?
दरम्यान, त्याआधी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली होती, त्यावेळीही दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली होती. या भेटीमागचे नेमके कारण काय हे अजूनही समोर आले नाही. एकीकडे दोन्ही गटातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढताना दिसत आहे, तर आता दुसरीकडे सरकारमध्ये जाण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार-खासदार चलबिचल असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार कि आणखी काही नव्याने पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे.





