Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार शनिवारी (ता. १२) सोलापूरच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या हस्ते विजापूर रोडवरील नेहरूनगर येथील स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरणासाठी जाणार होते. परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सोलापूर दौरा अचानक रद्द झाला आहे. आता शरद पवार स्व. चंद्राम गुरुजींच्या पुतळ्याचे ऑनलाईन पद्धतीने अनावरण करणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक आज दुपारी 2:00 पासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी ते सध्या यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयातील इनोव्हेशन सेंटरला भेट देणार आहेत. त्यानंतर शरद पवार हे दोन वाजता रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीला जाणार आहेत. ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालणार आहे. तसेच, सोलापूरमध्ये नाईट लॅंडिंगची सोय नसल्यामुळे शरद पवार यांना सोलापूर पोचण्यास अडचणी येत असल्याने शरद पवार यांनी सोलापूरचा रद्द केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सोलापूरच्या दौऱ्यावर दरम्यान, शरद पवार हे विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सोलापूरच्या दौऱ्यावर येणार होते. महाराष्ट्रात महायुतीची वादळ सुरू असताना सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार आमदार निवडून आले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा दौरा महत्वपूर्ण मानला जात होता. यामुळे आजच्या या दौऱ्यात शरद पवार नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु त्यांचा अचानक सोलापूर दौरा रद्द झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. हेही वाचा : गृहमंत्री अमित शाह रायगडावर दाखल; शिवरायांना केले अभिवादन