Sharad Pawar on India Us trade deal: भारत आणि अमेरिका व्यापार करारावर शरद पवारांची प्रतिक्रिया; शेतकऱ्यांबाबत चिंता व्यक्त करत म्हणाले…
Sharad Pawar on India Us trade deal: 'भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारामुळे भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची भीती'

Sharad Pawar on India Us trade deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला ऐतिहासिक व्यापारी करार अखेर सोमवारी उशिरा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या फोनवरील चर्चेनंतर या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे की, भारतावर लागू असलेलं २५ टक्के शुल्क आता तत्काळ प्रभावानं १८ टक्के असेल. भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार करारावर अनेक राजकीय नेतेमंडळींनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आज बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी या करारामुळे कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचा सविस्तर मसुदा समोर येणे बाकी आहे. मात्र, तुर्तास ज्या काही गोष्टी समोर येत आहेत, त्यावरुन भारतीय शेतकऱ्यांसाठी काळजी करण्याचा विषय आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार करारामुळे आगामी काळात भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
“अमेरिकेने भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. पण मला काही गोष्टींची चिंता वाटते. अमेरिकेला आता कृषी क्षेत्रात भारतात निर्यात करता येईल, अशी तरतूद या करारात आहे.
मात्र अमेरिका हा एक शक्तिशाली देश आहे. त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या वस्तूचे उत्पादन अन्य देशांमध्ये निर्यात करायला सुरुवात केली तर त्याचा विपरीत परिणाम त्या देशाच्या संबंधित भागावर होतो. आता ही गोष्ट भारतीय शेतकऱ्यांच्यादृष्टीने काळजी करण्यासारखी आहे. भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवारांची एका वाक्यात पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
…ही एक समाधानाची गोष्ट
या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, “केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होत असताना माझी गैरहजेरी कधीही राहिलेली नाही. मात्र, दुर्दैवाने अजित पवार यांचा अपघात झाल्याने मी दिल्लीला जाऊ शकलो नाही. त्यामुळे मला सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकता आले नाही.
पण मी जे काही वाचलं त्यावरुन दोन-तीन गोष्टी लक्षात येतात. अर्थसंकल्पात सामान्य माणसाला यातना होतील, असा नवा कोणताही कर लादण्यात आलेला नाही, ही एक समाधानाची गोष्ट आहे. मात्र अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा होती,” असे शरद पवार यांनी म्हटले.
हेही वाचा:
Patan News : गावात घुसला गवा अन् उकिरड्यात अडकला; ग्रामस्थांची पळापळ






