Sharad Pawar on Fadnavis । विधानसभा निवडणुकांच्या निकालात महायुतीला राज्यातील जनतेने पुन्हा एकदा सत्तेत बसण्याची संधी दिली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी शरद पवारांना सल्ला दिला आहे. “शरद पवार आपण ज्येष्ठ नेते आहात. किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल. तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, असे त्यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या टीकेला आता शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. निवडणूक यंत्रणांचा काळ सोकू नये म्हणून.. Sharad Pawar on Fadnavis । ईव्हीएम विरोधात आंदोनल उभारणाऱ्या मारकडवाडीच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी आज राष्ट्रवादीने (शरद पवार) कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शरद पवार म्हणाले, “आज जगात कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारताच याचा वापर का सुरू आहे. आज तुमच्या गावाने एका वेगळ्या पद्धतीने जायचे ठरवले तर सरकाने तुमच्याविरोधात खटला भरला. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सर्व माहिती मला द्या. याबाबतची तक्रार आम्ही राज्याचा निवडणूक आयोग, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे देऊ. हे कशासाठी? तर निवडणूक यंत्रणांचा काळ सोकू नये म्हणून. “ मी काय चुकीची गोष्ट केली? ; फडणवीसांना सवाल Sharad Pawar on Fadnavis । यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “मी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, पवार साहेबांनी हे करणे योग्य नाही. मी काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणे, तुमचे म्हणणे ऐकून घेणे चुकीचे आहे? लोकांच्या मनात काही शंका आहेत. त्याबद्दल जाणून घेणे, त्याचे निरसन करणे चुकीच आहे का?” हेही वाचा ‘होऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी’ ; संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचा राजीनामा