Sharad Pawar : डिलिमिटेशनला पाठिंबा देताच शरद पवारांना दुसरा मोठा धक्का
Sharad Pawar : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकाला (Delimitation Bill) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवल्याच्या चर्चांनंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ सुरू झाली आहे.

Sharad Pawar : डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या भूमिकेचे पडसाद आता बीड नगरपालिकेतील राजकारणातही उमटले आहेत. (Sharad Pawar)
बीडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासोबतच्या आघाडीतून पाठिंबा काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Sharad Pawar)
बीड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्रितपणे विरोधी बाकावर आहेत. मात्र, डिलिमिटेशन विधेयकाबाबत शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर दोन्ही पक्षांमधील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. (Sharad Pawar)
ठाकरे सेनेचा राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम पाटील यांनी राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीतून पाठिंबा काढून घेतल्याची माहिती दिली आहे. शरद पवारांच्या डिलिमिटेशन विधेयकावरील भूमिकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Sharad Pawar)
या निर्णयामुळे बीड नगरपालिकेतील विरोधी पक्षांच्या राजकीय समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्यस्तरावर सुरू झालेला राजकीय वाद आता स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचल्याचे या घडामोडीतून दिसत आहे. (Sharad Pawar)
दरम्यान, ठाकरे सेनेच्या या निर्णयानंतर बीड नगरपालिकेतील पुढील राजकीय भूमिका काय असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे. (Sharad Pawar)





