प्रभात वृत्तसेवा पारनेर – जीवनात कोणत्याही समस्येला तोंड देण्याची धमक निर्माण करणारे शिक्षण भावी पिढीला देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांनी केले.पारनेर तालुक्यातील सुपा येथे जवळपास २ ते अडीच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रयत संकुलाचे नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्राचार्य मंगेश जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य दादाभाऊ कळमकर यांनी केले. यावेळी माजी विद्यार्थी अप्पर जिल्हाधिकारी बन्सी गवळी, मुख्यमंत्री विशेष कार्यकारी अधिकारी देवराम पळसकर, उद्योजक अशोक माने, सुरेश अग्रवाल, सिमा चे अध्यक्ष अनुराग धूत, आयडीएल, जाफा, मिंडा, एपिटॉन या कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. खासदार नीलेश लंके, व्हाइस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक अनिल पाटील, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, सरपंच मनिषा रोकडे, माजी सभापती दीपक पवार, माजी सरपंच राजू शेख, माजी सरपंच विजय पवार, संस्थेचे सचिव, सहसचिव, ग्रामस्थ, कार्यकर्ते, रयतसेवक, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील १९९९-२००० च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेच्या फर्निचरसाठी ३५,५०० रुपये मदतीचा देणगीचा धनादेश पवार यांच्याहस्ते विद्यालयास देण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिथींच्या हस्ते करण्यात आले.