Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना खोकला आणि छातीत कफ झाल्याने पुण्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुबी हॉल क्लिनिकमध्ये ५ दिवस उपचार घेतल्यानंतर आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज ६ व्या दिवशी रुग्णालयातून व्हिल चेअरवर बसून ते रुग्णालयातून बाहेर आले. त्यांनी बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा हात दाखवून कार्यकर्ते आणि समर्थकांना अभिवादन केलं. त्यानंतर ते गाडीत बसले आणि घराच्या दिशेनं निघाले. दरम्यान, डॉक्टरांनी पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला शरद पवारांना दिला आहे. Sharad Pawar डॉक्टर काय म्हणाले? शरद पवारांच्या तब्येतीबाबत माहिती सांगताना रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी सांगितले की, “शरद पवार यांच्या छातीत संसर्ग झाला होता. त्यावर अँटीबायोटिक्स देण्यात आली असून त्याचा चांगला परिणाम झाला आहे. यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाली आहे. आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. Sharad Pawar : Pune News: पीएमआरडीएमध्ये डीपीऐवजी स्ट्रक्चर प्लॅन; नगर विकास विभागाचे प्राधिकरणाला आदेश ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र तीन-चार दिवस विश्रांती घेतल्यानंतर पवार प्रवास करून शकतात,” असंही डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, डिस्चार्जनंतर शरद पवार पुण्यातील मोदीबागेत पोहचले आहे. मोदीबागेतील निवासस्थानी ते पुढील काही दिवस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. Sharad Pawar हेही वाचा : Sunny Leone : ‘रागिनी MMS 3’मधून सनी लिओनीचा पत्ता कट; ‘या’ जोडीची होणार एन्ट्री