Sunny Leone : ‘रागिनी MMS 3’मधून सनी लिओनीचा पत्ता कट; ‘या’ जोडीची होणार एन्ट्री
Sunny Leone : सनी लिओनी या चित्रपटात झळकणार नसल्यामुळे काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Sunny Leone : ‘रागिनी MMS’ या हॉरर ड्रामा सीरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर या सीरिजच्या रागिनी MMS 2 हा सीक्वलमध्ये मुख्यभूमिकेत अभिनेत्री सनी लिओनी पाहायला मिळाली होती.
मात्र आता या सीरिजच्या येणाऱ्या तिसऱ्या पार्टमधून सनी लिओनीचा पत्ता कट झाला आहे. तिच्या जागी एक नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, रागिनी MMS 3 मध्ये आमिर खानचा लेक जुनैद आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे रुपेरी पडद्यावर या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दरम्यान, सनी लिओनी या चित्रपटात झळकणार नसल्यामुळे काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अद्याप फिल्म मेकर्सकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रागिनी MMS 3 चं दिग्दर्शन शशांक घोष करणार आहेत. शशांक यांनी रागिनी MMS च्या पहिल्या पार्टचंही दिग्दर्शन केलं होतं. 2011 साली रागिनी MMS ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजमध्ये राजकुमार राव, कॅनाज मोतीवाल मुख्य भूमिकेत झळकले होते. Sunny Leone :
त्यानंतर रागिनी MMS च्या दुसऱ्या पार्टमध्ये सनी लियोनी, साहिल प्रेम, संध्या मृदुल, कॅनाज मोतिवाला झळकले होते. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना मोठे यश मिळाल्यानंतर आता तिसऱ्या भागाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. Sunny Leone :
हेही वाचा:






