शरद केळकर ८ वर्षांनी छोट्या पडद्यावर करणार कमबॅक; सर्वात जास्त मानधन घेणारा ठरला अभिनेता

Sharad Kelkar | बॉलीवूडमधील अजय देवगण, अक्षय कुमार यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलेला अभिनेता शरद केळकर ८ वर्षांनी टीव्ही जगात पुनरागमन करत आहे. शरद केळकरने चित्रपट आणि टीव्हीच्या जगात तो एक मोठे नाव आहे. त्याचे अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले आहे.
आता शरद केळकरनं ‘तुम से तुम तक’ या मालिकेतून तब्बल 8 वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. तसेच तो छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. रिपोर्ट्सनुसार, शरद केळकरला या शोसाठी रोज 3.50 लाख रुपये मानधन मिळणार आहे. जर मालिकेचं शूटिंग महिन्याच्या 30 दिवस होत असेल तर त्या हिशोबानं शरद एका महिन्यात एक कोटींपेक्षा जास्त रक्कम कमावतोय.
‘तुम से तुम तक’ ही मालिका झी टीव्हीवर प्रसारित होत आहे. याशिवाय ही मालिका ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर देखील पाहता येऊ शकतो. यात शरद केळकर सोबत निहारिका चौकसे आहे. तो 28 एप्रिल रोजी सुरू झाला आहे. ही मालिका झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या सुबोध भावे आणि गायत्री दातारच्या मालिकेचा रिमेक आहे. Sharad Kelkar |
दरम्यान, शरद केळकर उत्तम अभिनेत्यासह तो एक उत्तम व्हॉइसओव्हर कलाकार देखील आहे. ‘बाहुबली’ सिनेमात शरद केळकरने प्रभासच्या भूमिकेसाठी आवाज दिला होता.
हेही वाचा:
आमदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले; २० लाख रुपये घेतल्याचा आरोप





