Sharad Kelkar | शरद केळकरचे 8 वर्षांनंतर मालिका विश्वात कमबॅक

Sharad Kelkar | अभिनेता शरद केळकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनयासह त्याने त्याच्या दमदार आवाजामुळे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र आता शरद केळकरने तब्बल 8 वर्षांनंतर मालिका विश्वात कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद केळकर 2017 मध्ये ‘कोई लौट के आया है’ मालिकेत शेवटचा दिसला होता. त्यानंतर तो चित्रपटांमध्येच पाहायला मिळाला. मात्र आता तो छोट्या पडद्यावर परतणार असून तो ‘तुम से तुम तक’ या मालिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री निहारिका चौकसे दिसणार आहे.
शरद केळकरच्या आधी या भूमिकेसाठी अभिनेता करण सिंह ग्रोवरचाही विचार झाला होता. त्याच्यासोबत हेली शाह झळकणार अशी चर्चा होती. मेकर्ससमोर करण सिंह ग्रोवर आणि शरद केळकर ही नावं होती. अखेर आता शरद केळकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. या मालिकेची शूटिंग अद्याप चालू झालेली नाही. लवकरच शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
शरद केळकरने उतरण, सलोनी का सफर, बैरी पिया, कुछ तो लोग कहेंगे, एजंट राघव यासारख्या मालिकांत काम केले आहे. त्याने बाहुबली, आदिपुरूष यासारख्या चित्रपटांच्या हिंदी डबिंगमध्ये अभिनेता प्रभाससाठी आवाज दिला आहे. याशिवाय लय भारी, हिरो, हाऊसफूल-4, भूमी, गलियोंकी रासलीला राम-लीला, लक्ष्मी, हलचल, तानाजी: द अनसंग वॉरियर, भेडिया आणि 1920 या चित्रपटांतही त्याने काम केले आहे.
हेही वाचा:
“जलसंपदा विभागाचं मोहित कंबोजशिवाय पानही हलत नाही”; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप





